Wednesday, August 10, 2016

आत्मपरीक्षण - लेख

एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण (अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?

तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो.

(डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)

तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.

महिला : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.

तरुण : बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!

महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?

तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!

महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
यावर हसत हसत फोन ठेवून निघाला.

दुकानदाराने त्याला थांबवले आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही न ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"

यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."

दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?

तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो" असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.

**********

# तात्पर्य : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक, ते महत्वाचे नाही, तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर आपण स्वतः !!

जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.

Written by : unknown creative

🌟🌷🌟🌷🌟🌷🌟🌷🌟🌷🌟

Thursday, August 4, 2016

मुलांच्या मनातले आईचे स्थान - लेख

मुलांच्या मनातले आईचे स्थान
- डाॅ. रोशन रानडे

आमच्या मातृत्वाच्या अनुभवा वरून मी आणि अस्मिताने असा एक आराखडा बांधलाय कि, मुलांच्या मनातले आईचे स्थान हे इंग्रजी U अक्षरा सारखे असते.

म्हणजे असं कि लेकरे अगदी चिल्लर असतात तेव्हा आई म्हणजे सर्वस्व असते. 'my mommy bestest' असते तेव्हा. तहान- भूक, झोप, शी-शू, दुखणं-खुपण असल्या सर्व महत्वाच्या प्रश्नावर तिच्याकडे रामबाण उपाय असतात, त्यामुळेच ती अगदी सर्वोत्तम असते.

शाळा सुरू झाली कि मुलांच्या भावविश्वात 'टीचर' नावाच्या एका व्यक्तिचा शिरकाव होतो. आणि आई कितीही उच्चविद्याविभूषित असूदे, ती टीचरपेक्षा हुशार नसते. इथे आईच्या स्थानाला धक्का बसायला सुरवात होते.

प्राथमिक शाळेत तरी परिस्थिती बरी असते, पण माध्यमिक शाळेत तर घसरगुंडीच चालू होते.

लेकरे किशोरवयीन झाली, म्हणजे आजच्या भाषेत terrible teens मधे गेली, की आईचे स्थान U च्या सगळ्यात खालच्या बाजूला पोहोचलेले असते. कारण?
'एकतर ती खूपच uncool असते. तिला modern gadgets काही वापरता येत नाहीत. स्वतःच्या स्मार्ट फोन वरचे सगळे फीचर्स सुद्धा वापरत नसते. तिचा fashion सेन्स OMG !!!!! तो nonexistent असतो.
केस विंचरले का? ब्रश केला का? कुठे चालले? कधी येणारे परत? असले बावळट प्रश्न मित्र मैत्रिणींसमोर विचारते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे सर्वांसमोर बच्चू, पिल्लू अश्या नावाने हाक मारते.
मी काय बेबी आहे का?'

ह्या नंतर पुढच्या शिक्षणासाठी घराबाहेर पाऊल पडते आणि आईचा भाव वधारायला सुरवात होते. होस्टेलच्या मेसमधले जेवायला लागल्यावर आईच्या हाताच्या चवीची फार प्रकर्षाने सय येते. ह्याही पुढे जाऊन स्वतःचे कपडे स्वतः धुणे, चहा कॉफी, maggi, अंडे असे साधेसेच का होईना खाद्य पदार्थ
बनवणे आणि मुख्य म्हणजे त्यानंतर भांडी घासून जागेवर ठेवणे इत्यादि इत्यादी… आता आईचे महत्व चांगलेच पटायला लागते.

ह्याहून पुढे जाऊन नोकरी चाकरी सुरू झाली कि, आपली आई आयुष्यभर बाहेरची आणि घरातली अश्या दोन डगरीवर पाय ठेऊन लीलया चालत आली आहे ह्याचे कौतुक वाटायला लागते.

आता आम्ही पुढच्या अंकाची वाट बघतो आहोत. जेव्हा आमची ही सुजाण बालके अजाण पालक बनतील आणि त्यांना बहुधा पुन्हा जाणवेल, 'my mummy bestest !' आमच्या सिद्धांताचा हा शेवटचा पडताळा!!!

- डॉ रोशन रानडे

💐🍥💐🍥💐🍥💐🍥💐

सुखांचे सॅशे - लेख

सुखांचे सॅशे!
लेखक - प्रसाद शिरगांवकर

आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो…  या दोन्हीच्या च्या रेग्युलर पॅक्स वरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते… आपण ते घ्यावेत का नाही या द्विधा मनःस्थितीत असताना दुकानदार हळूच सांगतो, ‘दोन्हीचे सॅचे आहेत साहेब… try करून बघा…’ मग आपण ते ‘सॅचे’ किंवा सॅशे बघतो… अगदीच पाच-दहा रुपयांना असतात… खुष होऊन आपण दोन्हीचे दोन-चार सॅशे घेऊन टाकतो आणि ताठ मानेनं घरी परत जातो!!

'सॅशे' हे भारतीय बाजारपेठेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेलं सगळ्यांत मोठं इनोव्हेशन आहे! हल्ली शांपू पासून सॉसेस पर्यंत, साबणांपासून मसाल्यांपर्यंत, गोळ्या-बिस्किटांपासून ते नारळपाण्याच्या पावडरी पर्यंत कशाकशाचेही सॅशे मिळतात… गिऱ्हाईकाला एकदम एक मोठ्ठा पॅक शे-दोनशे-चारशे रुपयांना घ्यायला लावायच्या ऐवजी दोन-पाच-दहा रुपयांचे ‘छोटे पॅक्स’ देणं हे त्या गिऱ्हाईकाच्या आणि आपल्याही फायद्याचं आहे हे आजकाल सगळ्याच कंपन्या जाणतात आणि तसं वागतातही…! आपणही खूप पैसे देऊन मोठ्ठे पुडे विकत घ्यायच्या ऐवजी कमी पैसे देऊन छोटे पॅक्स आणि सॅशेज विकत घेतो…

पण किराणामालाच्या दुकानातल्या व्यवहारांत दाखवत असलेला हा समजुतदारपणा आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र अमलात आणत नाही!!

आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो…. मोठ्ठं घर… मोठ्ठी गाडी… भरपूर बॅंक बॅलन्स… अफाट प्रसिद्धी… प्रचंड यश… वगैरे वगैरे वगैरे…. सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत रहातो… हे मोठे पॅक मिळाले / मिळवले तरच आनंदी होतो… नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी रहातो…

पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत तर छोट्याश्या सॅशे मध्येही मिळू शकतात हे आपण लक्षातच घेत नाही!!

म्हणजे,
"मोठ्ठं घर” होईल तेंव्हा होईल, पण सध्याच्या छोट्या घरात निवांत जगत सुखानं शांत झोप लागू शकणं हा किती छान सुखाचा सॅशे असतो...

"मोठ्ठी गाडी” घेऊ तेंव्हा घेऊ, पण सध्याच्या छोट्या गाडीतून वाऱ्यावर स्वार होऊन गावभर बेभान भटकणं हाही एक सुखाचा सॅशे असतो…

हेच सारं प्रसिद्धी, यश वगैरे साऱ्या साऱ्या मोठ्या पॅकेजेसचं… या सगळ्या मोठय़ा पॅकेजेसचे कोणते ना कोणते छोटे सॅशे असतात… जे आपण ओळखून अनुभवले ते मोठ्या पॅक्सहून जास्त सुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो…

रहाता रहाते गोष्ट ती "भरपूर बॅंक बॅलन्स” किंवा खिशातल्या अफाट पैशाची… पैसा हे एक असं पॅकेज आहे की ज्याच्या सॅशेमध्ये मजा नाही असं आपल्याला वाटतं… हजारच्या नोटेची किंमत शंभरच्या नोटेला नाही आणि शंभरच्या नोटेची ऊब पाच रुपयाच्या नाण्याला नाही…

खरंच असं वाटतं तुम्हाला?

तर मग, धो धो पाऊस कोसळत असताना, टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरम्म भजी हवी घेण्यासाठी हजारची नोट देऊन बघा किंवा लाखो रुपये बॅलन्स असलेलं तुमचं क्रेडिट कार्ड देऊन बघा…!!

नाही मिळणार ते सुख तुम्हाला हजारो लाखो रुपयांनी…

तिथे पाच रुपयांच्या कॉईन्सचे दोन-चार सॅशेच पुरेसे असतील!!

लेखक - प्रसाद शिरगांवकर

😊🌟😊🌟😊🌟😊🌟😊

Wednesday, August 3, 2016

श्रावण मासी हर्ष मानसी ...

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे
क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद धनुचा
गोफ दुहेरि विणलासे
मंगल तोरण काय बांधले
नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,
सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर
पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती
अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले
सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी
गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा
श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी
रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा
रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती
सुंदर बाला या फुलमाला
रम्य फुले पत्री खुडती

देव दर्शना निघती ललना
हर्ष मावे ना हदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे
श्रावण महिन्याचे गीत

**बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कविता**

⛅🌸🌳⛅🌸🌳⛅🌸🌳⛅

Tuesday, August 2, 2016

आयुर्वेदीय कविता

*आयुर्वेदीय कविता*

खोकून खोकून कोरडा झाला जर का *घसा।*
मधातून चाटा *हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा।।*

लागला मुका मार, सुजून पाय झाला असेल *गारद।*
लेपासाठी उगाळा *तुरटी, रक्त चंदन, आंबेहळद।।*

कोंड्याचा झाला आहे कां डोक्यामधे *साठा?*
केस धुतांना लावा *मेंदी, शिकेकाई, रिठा।।*

सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही *वंदन।*
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा *चंदन।।*

उन्हामधे रापून चेहरा झाला कां सावळा *गडद?*
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी *हळद।।*

बारीक आहे कुडी म्हणून होऊं नको तू *बावरी।*
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी *शतावरी।।*

पिकला एक केस होईल डोक्यावर *चांदी।*
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा *मेंदी।।*

केसांना लावा *कचूर सुगंधी, मेंदी, जास्वंद।*
केस होतील लांब सडक, *सुगंध दरवळेल मंद ।।*

गाणं म्हणण्यासाठी झालां आहांत तुम्ही *अधीर।*
गोड मधुर आवाजासाठी खा *ज्येष्ठमध, शंगीर।।*

अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का *सांधा?*
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या *अश्वगंधा।।*

पित्तप्रकोप झाला आहे, पोटातून येत आहेत कां *कळा?*
पोटात घ्या *आवळा, हिरडा, बेहडा म्हणजेच त्रिफळा।।*

वातामुळे पोटामध्ये होत आहेत कां *वेदना?*
खा *ओवा, सैंधव मीठ, आलं, लिंबू पुदिना।।*

संगणकावर काम करून थकली आहे कां *नजर?*
डोळ्यांसाठी खावे चांगले *पपई आणि गाजर।।*

लहान वयामध्येच ढोल मटोल झाला कां तुमचा *बेटा?*
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा *बटाटा।।*

धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता *कळस।*
शुद्ध हवेसाठी झाडे लावा *कडूनिंब आणि तुळस।।*

छोटे छोटे आजार, बरं कां, घरच्या घरीच *हटवा।*
प्रत्येकाच्या घरी असूद्या *आजीबाईचा बटवा।।

💐🌟💐🌟💐🌟💐🌟💐🌟💐

Written by : unknown creative 

Thursday, July 14, 2016

Be the CEO of your own life ...

अप्रतिम लेख ....

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नांवाला.
माणसं वाचत बसलो होतो.
विविध चेहऱ्यांची, आकारांची
माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)

माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.  ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, ’वाचन आवडतं?’

‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
’आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.

‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

‘खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’

‘हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’

‘नाही नाही…रोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
’हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

‘वेळ मिळत नाही. मी काढतो.
‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो..

फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना !
फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार आहे' असं कोणी म्हटलं नां! की माझी खात्री होते, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ त्याला हंसत असेल !’

मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’

मी आणखी हसू लागलो. ‘आय ऍम प्रीटी सिरीयस.. तुम्ही पाहिलंय यमाला ?

हो, मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..

हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !

तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..

‘साफ चूक' !  माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’

‘मी समजलो नाही.’

‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची संवय असते..
वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही..
ते कुठेतरी गुंतवतो.....  भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून !

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..

आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे,
आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’.
या पुढे एकेका घासाची मजा घ्यायची..
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’

‘म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.

‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे… जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही..

आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते केलेत त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.

मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला..
‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो..

दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.

माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत..

फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ.बी आर आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
महात्मा गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा
इत्यादि इत्यादि’....

माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.

‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं.
या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.

मी काय करतो… अं…उदाहरण देतो…
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू?

मग ते सांगतील ते करतो.

व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.

कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.

मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.

कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’

माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..
’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल'.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम !
आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो..

जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.

हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय..

गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light..

मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’

मी त्या तरुणाला नांव विचारलं, त्याने लगेच सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.

मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.

तुम्ही…प्लीज..कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.

अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’ मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं..
वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली..

मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता..

त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.

मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’

परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.

कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा असा हा अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life .

बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात.

👍👉👍👉👍👉👍👉👍👉👍

Written by : unknown creative 

Sunday, July 10, 2016

कर ले तू प्राणायाम ...

🙋 कर ले तू प्राणायाम .....

कर ले तू प्राणायाम, सब रोग दूर हो जाएगा।
रोना नही होगा, जीवन खुशियों से भर जाएगा॥

जीवन तुम्हारा दूर्धर है आज, कल तू ही इतराएगा।
आज तुझे विश्वास नहीं, कल दुनिया को बतलाएगा॥
कर ले तू प्राणायाम …..

पांच मिनट भास्त्रिका करले, रक्त शुद्ध हो जायेगा।
सर्दी जुकाम एलर्जी दूर, मन स्थिर हो जायेगा॥

पन्द्रह मिनट कपालभांती कर, मुखमंडल तेज हो जायेगा।
गैस कब्ज, मधुमेह सहित, मोटापा दूर हो जाएगा॥
कर ले तू प्राणायाम ………

पांच बार बाह्य प्राणायाम कर, चंचलता दूर हो जायेगा।
उदर रोग सब दूर होकर , जठराग्नि प्रदीप्त हो जायेगा॥

दस मिनट अनुलोम-विलोम कर, सिरदर्द ठीक हो जायेगा।
नकारात्मक चिन्तन से दूर, आनंद, उत्साह बढ़ जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ……….

ग्यारह बार भ्रामरी कर, सब तनाव दूर हो जायेगा।
रक्तचाप हृदय रोग सहित, उत्तेजना मिट जाएगा॥

इक्कीस बार ओंकार जनकर, अनिद्रा रोग ठीक हो जायेगा।
बुरे स्वप्नों से छुटकारा पाकर, ध्यान तेरा लग जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ……….

तीन बार नाड़ी शोधन कर, रक्त संचार ठीक हो जायेगा।
बहरापन, लकवारोग मिटे, ऑक्सीजन बढ़ जायेगा॥

पांच बार उज्जायी कर, गला मधुर हो जायेगा।
सर्दी जुकाम सहित, हकलाना, ठीक हो जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ……

ग्यारह बार शीतकारी कर , पायरिया दूर हो जाएगा।
दंत रेाग दूर होकर, शीतल शरीर हो जायेगा॥

ग्यारह बार शीतली कर, भूख प्यास मिट जायेगा।
मुंह गले के रोग सहित, पित्त रेाग मिट जायेगा॥
कर ले तू प्राणायाम ......…

तीन बार सिंहासन कर ले, दर्द गले का ठीक हो जायेगा।
अंत में हृस्यासन कर ले, हंसते जीवन बीत जायेगा॥

कर ले तू प्राणायाम, सब रोग दूर हो जाएगा ।
रोना नही होगा, जीवन खुशियों से भर जाएगा॥

ॐ शान्ति ॐ शान्ति ॐ शान्ति
--------------------------------------

Written by : unknown creative 

कविता - एवढंच देवाला मागावं....

" कट्टी आणि बट्टी"
--------------
अगोदरची पिढी तशी
खूपच  गरीब  होती
तरीही ती एकमेकांच्या
बरीचशी   करीब होती

आवर्जून सगळेजणं
जाणं येणं ठेवीत होते
सुख असो दुःख असो
हात पुढे येत होते

काका काकू , मामा मावशी
आपलेपणा वाटायचा
दिवाळीत , लग्नाकार्यात
अख्खा वाडा नटायचा

प्रत्येकजण प्रत्येकाला
भरभरून बोलायचा
आपलं माणूस दिसलं की
संपूर्णपणे उकलायचा

हसणं काय रुसणं काय
सारं कसं आतून यायचं
कट्टी संपून बट्टी झाली की
पुन्हा प्रेम ऊतू जायचं

आतलं दुःख सांगितलंकी
हलकं हलकं वाटायचं
अनुभवाच्या शिदोरीतून
बरंच  काही  भेटायचं

पहाडा सारख्या प्रश्नांनाही
तेंव्हा उत्तरं सापडायची
सगळीच माणसं चारचौघात
सुखदुःख  पाखडायची

अहंकार आणि स्वार्थामूळे
आता अनर्थ घडला आहे
नातेगोते  असून सुद्धा
माणूस एकाकी पडला आहे

सुबत्तेला सुख समजून
आपली माणसं तोडू नये
जगाशी नातं जोडताना
जुनी मुळे खोडु नये

भाऊ भाऊ बहिणी बहिणी
एकमेका कडे जातात का ?
समोरा समोर आल्यानंतर
दोन शब्द बोलतात का ?

वर्षानुवर्षे कॉलनीत राहून
कुणीच आपलं वाटत नाही
मी पणाच्या तोऱ्या मुळे
शेजाऱ्याशी पटत नाही

कुठे तरी कधी तरी
हा दुरावा संपला पाहिजे
घर असो दार असो
आपण माणूस जपला पाहिजे

उत्तरार्धात अनेक प्रश्न
जेंव्हा समोर नाचू लागतात
भांबावलेली माणसं तेंव्हा
धर्मग्रंथ वाचू लागतात

चलतीच्या काळात सुद्धा
मिळून मिसळून वागावं
नेहमी चांगली बुद्धी दे
एवढंच देवाला मागावं.

🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺

Written by : unknown creative 

Friday, July 8, 2016

बारिश पड़े तो ... खुद से मिल लीजिये ।।

बारिश पड़े तो भागिए नहीं.. छत नहीं खोजिये..
छाते कभी-कभार बंद रखिये.. किस बात का डर है..?
भीग जायेंगे..?
तो क्या हुआ.. पिघलेंगे नहीं..
फिर से सूख जायेंगे..
आपकी हजार रुपए वाली टी-शर्ट भी सूख जायेगी.. ब्रांड उसका लेविस से लेबिस नहीं होगा..
मोबाइल को पालीथीन में कस के रख लीजिये..
सड़क साफ़ है.. कोई नहीं आएगा..
उस स्ट्रीट लैम्प की पीली रौशनी में डिस्को करती बूंदों को देखिये..
थोड़ा धीरे चलिए.. जल्दी पहुंच के भी क्या बदल जाना है..
बारिश बदलाव है.. मौसम का.. मन का.. कल्पनाओं का.. और लाइफ के गियर का दिमाग से दिल की तरफ..
सब धुल रहा है.. प्रकृति सब कुछ धो रही है.. आप क्यूँ उसी मनहूसियत की चीकट लपेटे घूम रहे हैं..
कागज़ की नाव, कोचिंग में भीगे सिर आई वो लड़की, बारिश में जबरदस्ती नाचने को खींच के ले गये दोस्त..
सब चलते-चलते याद कीजिये..
दुहराना आसान नहीं होता.. दुहराना चाहिए भी नहीं.. लेकिन सहेजा जा सकता है..
ताकि ऐसी किसी बारिश में चलते-चलते सोच के मुस्कुराया जा सके..
ज़ुकाम से मत डरिये.. दवा से सही हो जायेंगे..
बारिश से डरेंगे तो फिर आपका महंगा वाला शावर भी ठीक नहीं कर पायेगा..
और वैसे भी.. मैंने शावर में सिर्फ लोगों को रोते सुना है.. मुस्कुराते नहीं.. बारिश आई है..
थोड़ा चल लीजिये.. खुद से मिल लीजिये.. मुस्कुरा लीजिये.. ।।

☁💧🌈☁💧🌈☁💧🌈☁

Written by : unknown creative 

Tuesday, July 5, 2016

चिमटीत पकडून ठेवायचंय खूप काही...

चिमटीत पकडून ठेवायचंय खूप काही.

शब्द, त्यांचे नेमके अर्थ
स्पर्श, त्यांचे नेमके अर्थ
सगळंच निसटून जायच्या आधी
घट्ट धरून ठेवायचंय खूप काही.

देहावरच्या खुणा, अस्पष्ट
मनावरच्या खुणा, जरा जास्तच स्पष्ट
बुद्धी फार काम करायला
लागायच्या आधीच
गोंदून घ्यायचंय खूप काही.

माझा श्वास, तुझ्यात गुंफण
तुझा श्वास, माझ्यात रिंगण
सवय 'व्यसन' बनण्याआधीच
सोडवून घ्यायचंय खूप काही.

मोकळं व्हायचंय..बेभान जगायचंय
होऊन द्यायचंय खूप काही..!!

- स्पृहा

🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁

Thursday, June 30, 2016

मी शोधलीय "शांती" आणि घराचं नावच "समाधान" ठेवलंय

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला. मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.

आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....

त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.

मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.  कस काय सर्व ? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, छान चाललय सगळं....... "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.
तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर ओशाळलं आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय.....

एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला.

मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय."

😇🌹😇🌹😇🌹😇🌹😇🌹😇

Written by : unknown creative 

Monday, June 27, 2016

त्यालाच 'आयुष्य ' म्हणतात.. -- व. पु. काळे

जग कसं अजब आहे..

देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
पण ' त्याच्या घरी ' जायची घाई मात्र कुणालाच नाही.

आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.

देव आपल्या घरी आला,म्हणजे सण,उत्सव आणि आनंद.
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख,शोक..

देव आपल्या घरी यावा,म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा..

देवाघरून येणं,म्हणजे जन्म..देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे.

पण ह्या मधली जी गम्मत आहे,
त्यालाच 'आयुष्य ' म्हणतात.

- -  व. पु. काळे

🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼🎵🎼

Sunday, June 26, 2016

'उपयोग काय त्याचा?' - विं. दा करंदीकर

विं. दा करंदीकर यांची एक छान कविता -

शीर्षक - 'उपयोग काय त्याचा ?'

शब्दांत भाव नाही,
ना वेध अनुभवाचा ;
रचना सुरेख झाली !
उपयोग काय त्याचा ?

व्याहीच पत्रिकेचा
घालीत घोळ बसले;
नवरी पळून गेली !
उपयोग काय त्याचा ?

सुगरण रांधणारी,
सुग्रास अन्न झाले ;
अरसिक जेवणारे,
उपयोग काय त्याचा ?

जमली महान सेना,
शस्त्रे सुसज्ज झाली ;
नेता कचखाऊ निघाला,
उपयोग काय त्याचा ?

ऐश्वर्य प्राप्त झाले,
झाली दिगंत कीर्ती ;
स्नेही न एक लाभे !
उपयोग काय त्याचा ?

सर्वांस स्वास्थ्य आले,
सगळीकडे सुबत्ता ;
स्वातंत्र्य फक्त नुरले !
उपयोग काय त्याचा ?

केले गुरु अनेक,
यात्रा कित्त्येक केल्या ;
शांती न प्राप्त होता,
उपयोग काय त्याचा ?

🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁

बायको बरोबर साड्यांच्या दुकानात.. - पु. ल.

"ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं...

"लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न...

"बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न...

"श्रीखंडी?... नको... चिकट असेल..." मी उगाच विनोद मारायचा प्रयत्न केला... पण त्यावर बायको आणि तिला उत्साहानं साड्या दाखवणारा सेल्समन दोघांच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हालली नाही...

"बरं, ते ही जाऊ दे.... चिंतामणी किंवा गुलबक्षी रंगात काही बघू का यंदा" बायकोनी विचारलं...

आता मला माझ्या अज्ञानाची प्रकर्षानं जाणीव व्हायला लागली...

जगात "ता ना पि हि नि पा जा" हे एवढेच सातच रंग असतात ही माझी पक्की समजूत होती आणि आहे... त्यातल्याही, तांबड्या आणि नारंगीत किंवा निळ्या आणि जांभळ्यात मला पटकन फरक समजत नाही... या शिवाय पारवा हे रंगाचं नसून कबुतरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव आहे अशी माझी अनेक वर्षं समजूत आहे...

हे सात रंग आणि सरधोपट पांढरा किंवा काळा हे रंग सोडले रंगांच्या इतर छटा एकतर मला ओळखता येत नाहीत किंवा काहीतरी वेगळं आहेच असं वाटलं तर त्यांची नावं मला समजत नाहीत...

माझा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे, मला हिरवा रंग हिरवाच दिसतो, त्यातल्या कशाला पोपटी म्हणायचं, कशाला सी ग्रीन म्हणायचं आणि कशाला बॉटल ग्रीन हे कळत नाही... तेच निळ्या रंगाचं... निळा म्हणजे निळा... त्यात स्काय ब्लू कोणता आणि मोरपंखी कोणता याचंही मला आकलन होत नाही...

या शिवाय, "डाळिंबी" हा रंग नसून ते "मोसंबी" सारखं देशी दारूचं नाव असावं, "तपकिरी" हे तपकीरचं अन "शेवाळी" हे शेवाळ्याचं अनेक वचन असावं आणि मोतिया हे एखाद्या नबाबाघरच्या पांढऱ्या कुतियेचं नाव असावं अशीही माझी अनेक वर्षं समजूत होती...

पण बायको बरोबर साड्यांच्या दुकानात गेलं की या साऱ्या साऱ्या समजुतींना सुरुंग लागतो. अन या सुरुंगाच्या स्फोटातून लाल, तांबड्या, नारंगी, चिंतामणी, पिवळ्या आणि लिंबू रंगांच्या ज्वाला उसळायला लागून त्यातून राखाडी, पारवा, तपकिरी, किरमिजी रंगांच्या धुराचे लोट उसळायला लागतात...

असो. तर मी असा माझ्या अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या घेत असतानाच बायकोचा पुढचा प्रश्न आला....

"ही केतकी रंगाची साडी कशी आहे? बघ ना... आमसुली काठ आहेत..."

"आमसुली?" माझा शेवटचा प्रश्न असतो...

त्याकडे दुर्लक्ष करून बायको ती साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःला न्याहाळायला लागते.

अन आपल्याला आवडलेली साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःकडेच बघत असताना, तिच्या चेहऱ्यावर जो रंग उजळलेला दिसतो त्या रंगाचं नाव काय असावं याचा मी विचार करत बसतो.

- पु. ल. देशपांडे

🎉🎀🎉🎀🎉🎀🎉🎀🎉🎀🎉

Saturday, June 25, 2016

काही शब्द जीवाभावाचे वाटतात, कारण ...

आयुष्यात माणसांचे येणं-जाणं चालूच असतं.
भूतकाळ आठवला की कळतं, कित्येक हात आपणही सोडलेत.

एकेकाळी त्यांच्या शिवाय जगणं जमेल की नाही हा प्रश्न पडलेले आपण अजूनही जिवंत आहोत.
का? कारण शरीर निर्लज्ज असतं.

वेळ जाते, माणसं बदलतात, माणसांसोबत आपणही बदलतो. कुणी आलं म्हणून त्रास होतो, तर कुणी गेलं म्हणून त्रास होतो, कधी आलेलं गेलं म्हणून त्रास होतो तर कधी गेलेलं आलं म्हणून त्रास होतो. पण कुणी गेलं तरी आयुष्याच्या काही क्षणी त्या व्यक्तीची आठवण प्रकर्षाने येते. आठवण काढता येत नाही. ती येते विना परवानगी.

एकेकाळी 'आपण' असलेला शब्द 'तू' आणि 'मी' झाल्यावरही तितकाच जवळचा वाटू शकतो!
काही दिसलं काही ऐकलं की, आठवतं काही न काही....कोणी ना कोणी.

शब्द एकटे नसतात. शब्दांना माणसं चिकटलेली असतात, म्हणूनच काही शब्द जीवाभावाचे वाटतात.

☺❤☺❤☺❤☺❤☺❤☺❤☺

Written by : unknown creative 

Three simple rules in Life

Three simple rules in Life:

1. If you do not go after what you want, you will never have it.

2. If you don’t ask, the answer will always be no.

3. If you do not step forward, you’ll always be in the same place.

Dare to Believe ;
Dare to Dream ;
Dare to Achieve !!

🌷👍🌷👍🌷👍🌷👍🌷👍🌷

Written by : unknown creative 

पु.लं.चा अतिसुंदर लेख - क्षणांचे सोने...

पु.लं.चा अतिसुंदर लेख

क्षणांचे सोने...

जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते तो या जगातला सर्वांत सुखी माणूस. झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.

असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नव्या उमेदीनं कामाला लागतो.

असा माणूस शेअर्सच्या चढ-उतारांमुळं भयभीत होत नाही, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळं विचलित होत नाही. घरांच्या वाढत्या किंमतीमुळं अस्वस्थ होत नाही.

भावनांच्या घातक चढ-उतारावर टीआरपीचं गणित असणाऱ्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरील उथळ कार्यक्रमांनी तो भावविवश होत नाही.

त्याच्या घरात ब्लडप्रेशरच्या गोळ्या नसतात, पोट साफ करण्याची चूर्णं नसतात. अंगारे-धुपारे, मंत्र-तंत्र असल्या कर्मकांडात त्याला रस नसतो. तो इमाने इतबारे आपला नोकरीधंदा करतो. बायको-मुलांना नीट सांभाळतो. घरात लक्ष देतो. पाहुण्या-रावळ्यांची देखभाल करतो. बायकोला हवं नको पाहतो. मुलांच्या शाळा-कॉलेजात जाऊन येतो. त्यांची ऍडमिशन-परीक्षा-निकाल साऱ्याचं वेळापत्रक त्याला तोंडपाठ असतं.

त्याला एक मुलगी असली तरी तो खुष असतो. दोन मुली असल्या तरी खुष असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदाने जगत असतो.

त्याला राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती असते. पाणीकपात कधी आहे, मेगाब्लॉक कधी आहे, मोठी भरती कधी आहे, भाज्यांचे-डाळीचे भाव काय आहेत हे माहीत असते. या गोष्टींचा तो बभ्रा करीत नाही की त्यांना तो आपल्या व्यक्तिमत्त्वावर स्वार होऊ देत नाही. त्यांना तो समंजसपणे सामोरा जातो...

तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. लोकांच्या सुखदु:खाशी तो अकृत्रिमपणे समरस होतो.

त्यानं अतिशय नियोजनपूर्वक पै-पैसा साठवून स्वत:चं छोटंसं घर मिळवलेलं असतं. किंवा तेवढ्याच आनंदानं तो पागडीच्या किंवा भाड्याच्या घरात राहात असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपली तुलना करत नाही, दुसऱ्याच्या यशानं कुढत बसत नाही. नशापाणी करण्याची त्याला गरज वाटत नाही; कारण या लहान-मोठ्या गोष्टीत आनंद घेत तो दिवसभर इतका बिझी असतो की जमिनीला पाठ टेकताच त्याला आपोआप झोप येते.


परिसाच्या शोधात प्रत्येक दगडावर आपल्या हातातलं लोखंड ठोकत फिरणाऱ्यांपैकी तो नसतो; कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे सोने कसे करायचे हे त्याला ठाऊक असते..!

~ पु. ल. देशपांडे

💐💐💐💐💐💐💐

Friday, June 24, 2016

जिन्दगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम ...

जिन्दगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर
पतझड में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं
वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्रभर चाहे कोई पुकारा करे उनका नाम
वो फिर नहीं आते ...

आँख धोखा है, क्या भरोसा है, सुनो
दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने ना दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो, रुठकर उनको जाने ना दो
बाद में प्यार के, चाहे भेजो हजारो सलाम
वो फिर नहीं आते ...

सुबह आती है, रात जाती है, यूँही
वक्त चलता ही रहता है, रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता है
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंजर बदल जाता है
एक बार चले जाते हैं, जो दिन रात सुबह शाम
वो फिर नहीं आते ...

गीतकार : आनंद बक्षी, गायक : किशोर कुमार, संगीतकार : राहुलदेव बर्मन, चित्रपट : आप की कसम (१९७४)

🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

Thursday, June 23, 2016

साधं सोप्पं जगावं...

साधं सोप्पं जगावं
दिलखुलास हसावं

न लाजता रडावं
राग आला तर चिडावं
पण झालं-गेलं वेळीच सोडावं

आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं
रूसलेल्यांना लाडानी पुसावं

वळण येईल तेंव्हा सावकाश वळाव
मोकळ्या रस्त्यावर सुसाट पळावं

खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं
स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं
 
सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र
त्या परमेश्वराचं कौतुक जरूर कराव.

🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹


Written by : unknown creative 

श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते की ..

श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती.

 त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली.
 तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला.

 प्रसंगी पळसुद्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वतःची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही,

ना उपास केले.
ना अनवाणी पायाने फिरला..

त्याने पुरस्कार केला फक्त " कर्मयोगाचा!! "

भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला.
तेव्हा कृष्णाने, ना अर्जुनाची कुंडली मांडली,
ना गंडे-दोरे बांधले.

 तुझं युद्ध तुलाच करावं लागेल असं त्याने
 अर्जुनाला ठणकावून सांगितलं.

 अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं ....
तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वतः
अर्जुनातर्फे लढाई केली नाही. .....

श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता.
त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. . .

 पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही.
 जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. .
एक महान योद्धा सारथि बनला.
अर्जुनाला स्वतःची लढाई ,
स्वतःलाच करायला लावली.. . .
 ह्या कृतीतून संदेश दिला कि ,
जर तुम्ही स्वतःचा संघर्ष करायला,
 स्वतः सज्ज झालात तरच
 मी तुमच्या पाठीशी आहे .. .
मी तुमचा सारथि  बनायला तयार आहे..

 पण तुम्ही लढायला तयार नसाल,
 तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही . . .

तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.

कोणत्याही देवाचा-देवीचा . .
आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा ..
श्रीकृष्णाला विसरू नका.

अनवाणी चालत जायची गरज नाही. . .
उपाशी राहायची गरज नाही...
 शस्त्र खाली टाकू नका. . .

प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. . .
नेमकं तेच शस्त्र काढा  . .
आणि त्याचा उपयोग करून लढा. . . .
कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही. . .

तुमची स्वप्नं फुकटात पूर्ण करून देणार नाही.
स्वतःची लढाई स्वत:च लढा !!!
👍☺👍

Written by : unknown creative 

Wednesday, June 22, 2016

गोंद्या आला रे ... २२ जून १८९७

"गोंद्या आला रे"

२२ जून १८९७

चाफ़ेकर बंधूंकडून पुण्याच्या गणेशखिंडीत रॅंडचा वध. २२ जून हा चाफेकर बंधूंनी केलेल्या रॅंड वधाच्या घटनेचा स्मृतिदिन.

देशात उफाळलेल्या असंतोषाचे प्रतीक म्हणून या थरारक प्रसंगाची गणना केली जाते. स्वातंत्र्य संग्रामात इंधन ओतण्याचं काम करणाऱ्या या घटनेचं ऐतिहासिक मोल मोठं आहे.

१८९६ च्या अखेरीस पुण्यात प्लेगचा कहर उसळला. त्या कामी सरकारने केलेली उपाययोजना व्याधीच्या दृष्टीने योग्य होती. पण, लोकांच्या भावना लाथाडून केल्यामुळे लोक संतप्त बनले. रूग्णालयात जाणं म्हणजे मरण असे त्यांना वाटू लागले आणि ते रोग लपवू लागले. त्यामुळे इंग्रजांचे शोधपथक पुण्यातील घराघरांतून धुमाकूळ घालू लागले. देवघरातील देवावर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. लोकांच्या देवधर्माच्या भावनांना लाथाडणे, मुलीबाळींना घराबाहेर ओढणे आणि पुरुषवर्गाला अनेकप्रकारे अपमानित करणे याचा उच्छाद मांडला गेला होता. यामुळे दामोदरपंतांची रॅंड वधाची इच्छा तीव्र झाली.

पुण्याचे लोक अत्याचाराने त्रस्त असतानाच सरकारने व्हिक्टोरिया राणीचा हीरकमहोत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. या दिवशीच रॅंडचा वध करायचा निश्चय दामोदरपतांनी केला. २२ जून १८९७ रोजी राणीच्या हीरकमहोत्सवा- निमित्त गणेशखिंडीत मेजवानी देण्यात आली. त्यावेळी अनेक युरोपियन हजर होते. या दिवशी दामोदरपंत, रानडे, बाळकृष्ण आणि विनायक आपटे आपापली रिव्हॉल्वर घेऊन सायंकाळी साडेसातच्या सुमारास बाहेर पडले आणि गणेश खिंडीतील गव्हर्नमेंट हाऊसपासून थोड्या अंतरावर काळोखात दबा धरून बसले.
मेजवानीनंतर रॅंड गाडीतून परत जाऊ लागला की "गोंद्या आला रे आला' असा खुणेचा शब्द उच्चारायचे ठरले. त्यासाठी वासुदेव चाफेकरांना मागावर पाठवण्यात आले.

मेजवानी झोडून पाहुणे गव्हर्नमेंट हाऊसमधून परतू लागले. गाड्या उतारावर येताच "गोंद्या आला रे आला' हा परवलीचा शब्द उच्चारला गेला आणि रॅंडसारखी दिसणारी आयर्स्टची गाडी दिसताच बाळकृष्णपंतांनी आयर्स्टच्या मस्तकावर पिर्स्तेल झाडलं. गाडीत बसलेल्या मिसेस आयर्स्टला हे कळताच तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.

बाळकृष्णपंतांनी गोळी लागल्याने कोसळलेल्या व्यक्तीला पडताना पहिले परंतु वासुदेवरावांचा परवलीचा घोष अद्याप सुरूच होता. चुकून भलताच माणूस मारला गेला ही गोष्ट दामोदरपंतांच्या लक्षात आली. तोच रॅंडची गाडी आणि तिच्या पाठोपाठ धावणारा वासुदेव चाफेकर त्यांना दिसला.

दामोदरपंतांनी तात्काळ गाडीवर उडी घेऊन रॅंडच्या पाठीला पिस्तूल लावून चाप ओढला. गोळ्या फुफ्फुसातून आरपार जाऊन रॅंड बेशुध्द पडला. गोळ्या लागताच आयर्स्ट मरण पावला. रॅंड मात्र औषधोपचारांनी बेशुध्दीतून २२ जूनला थोडा शुध्दीवर आला पण त्याला कोणतेही वक्तव्य करता आले नाही. रॅडने ३ जुलै १८९७ रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. रँडची हत्या हि पहिली राजकीय हत्या ठरली.

पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. रँड प्रकरणी हत्या करणाऱ्यांची नावे इंग्रज सरकारला कळवनारयास २०००० रू. चे बक्षीस देण्यात येईल  असे इंग्रज सरकारने जाहीर केले होते.

चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. रँडची हत्या केल्या प्रकरणी चाफेकर बंधूंची नावे गणेश व रामचंद्र द्रविड यांनी इंग्रज सरकारला कळवली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली.

दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना ८ मे १८९९ तसेच बाळकृष्ण चापेकर यांना १२ मे १८९९ रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.

रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते २७ वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते २४ वर्षे व वासुदेवरावांचे वय होते १८ वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरुणांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन. 🙏
===========================

साभार - Nitin Pise

Balance sheet of Life

*BALANCE SHEET Of LIFE*

Birth is your
*Opening Stock*.
                 
What comes to you is
*Credit.*
                 
What goes from you is
*Debit.*

Death is your
*Closing Stock.*

Your ideas are your
*Assets.*

Your views are your
*Liabilities.*

Your happiness is your
*Profit.*

Your sorrow is your
*Loss.*

Your soul is your
*Goodwill*.

Your heart is your
*Fixed Assets*.

Your duties are your
*outstanding Expenses.*

Your friendship is your
*hidden Adjustment.*

Your character is your
*Capital.*

Your knowledge is your
*Investment*.

Your patience is your
*Bank Balance*.

Your thinking is your
*current Account*.

Your behaviour is your
*journal Entry*.

Bad things is your
*Depreciation*.

Have a nice balance sheet.

And ...

Always Remember
*GOD is your Auditor* 🙏

========================

Written by : unknown creative 

सुंदर काय असतं...

*सुंदर काय असतं...*

जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्कारा ऐवजी फक्त प्रेमच करतं...ते मन सुंदर...!!!

चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात...ते विचार सुंदर...!!!

कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते...ते नाते सुंदर...!!!

ज्यामध्ये एकमेकांची आठवण काढल्याशिवाय जगू शकत नाहीत...ते मनापासून असलेलं प्रेम सुंदर...!!!

कुठल्याही अपेक्षेशिवाय एकमेकांना दिलेली कायमची साथ... एकजीव असल्याची जाणीव असते...ती साथ आणि जाणीव सुंदर...!!!

जिथे आपलं मन विश्वासतं... जिथे आपलं मन जपलं जातं... असा मिळवलेला विश्वास आणि आपल्या मनाला जपणारं कोंदण सुंदर...!!!

🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

Written by : unknown creative 

Tuesday, June 21, 2016

जाग येता पहिल्या प्रहरी ...

❗जाग येता पहिल्या प्रहरी
   हळुवार डोळे उघडावे...

❗मग पाहून हातांकडे
   कुलदेवतेला स्मरावे...

❗अंथरुणातून उठताक्षणी
   धरतीला नमावे...

❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
   आठवावे...

❗सर्व आन्हिके झाल्यावर
   देवाचरणी बसावे...

❗काही न मागता
   त्यालाच सर्व अर्पावे...

❗घरांतून निघता बाहेर
   आई वडिलांना नमावे...

❗येतो असा निरोप घेऊन
   मगच घर सोडावे...

क्षणभर दाराबाहेर थांबून
   वास्तूला स्मरावे...

❗समाधानाचे भाव आणून
   मगच मार्गस्थ व्हावे...

❗चेहऱ्यावर स्मित हास्य
   नेहमी बाळगून चालावे..

❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
   आनंदाने पहावे...

❗जगात खूप भांडण तंटे
   आपण शांत राहावे...

❗सतत तोंडात मध आणि
   मस्तकी बर्फ धरावे...

❗जीवन हे मर्त्य आहे
   नेहमी लक्षात असावे...

❗प्रत्येक क्षण हेच जीवन
   हेच मनी ठसवावे...

❗सत्याने वागून नेहमी
   जीवन आपुले जगावे...

             💞💞
आपला दिवस आनंदात जावो.
           
  💓💓 🗻👼🗻 💓💓


Written by : unknown creative

Art of life

🍁 😊🌹😊 🍁
       
सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...

खूप जणं आपल्या जवळ येतात आणि दुरावतात...
 
सूर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते...

पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात....
         
जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life"
                 आणि...
 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" ...!

💐  💐 💎 😊 👑 💐 💐

 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


Written by : unknown creative 

आयुष्य खूप सुंदर आहे

कुणीतरी बर्फाला विचारले
आपण एव्हढे थंड कसे ?

"बर्फाने अतिशय छान उत्तर
दिले.... "

माझा भूतकाळही पाणी आणि भविष्यकाळ सुध्दा पाणीच...!!

मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ...?

💕आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकाना समजून घ्या..,  आणि एकमेकांना जीव लावा.... 💕

♻ 💫 ♻


Written by : unknown creative 

आयुष्याची ङायरी ...

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो...

पण वाचणारे आपण असतो,
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत...

परिस्थिती जेव्हा अवघड असते  तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि  पैसा " नाही तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात ...

म्हणून स्वभाव व संबंध असे ठेवा की समोरच्याला सतत आपली आठवण येत राहीली पाहीजे...

🙏 ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु  🙏


Written by : unknown creative 

वर्षाचे महिने असतात बारा, प्रत्येकाची न्यारीच त-हा

चैत्र नेसतो सतरा साड्या

वैशाख ओढतो व-हाडाच्या गाड्या

ज्येष्ठ बसतो पेरित शेती

आषाढ धरतो छत्री वरती

 श्रावण लोळे गवतावरती

भाद्रपद गातो गणेशमहती

आश्विन कापतो आडवे भात

कार्तिक बसतो दिवाळी खात

मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे

पौषाच्या अंगात उबदार कपडे

 माघ करतो झाडी गोळा

फाल्गुन फिरतो जत्रा सोळा

 वर्षाचे महिने असतात बारा

प्रत्येकाची न्यारीच त-हा ।।

♡☆♡☆♡☆♡☆♡☆♡☆♡☆♡


Written by : unknown creative

मिले सुर मेरा तुम्हारा ...

मिले सुर मेरा तुम्हारा
तो सुर बने हमारा
सुर की नदियाँ हर दिशा से
बहते सागर में मिलें ... बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा … मिले सुर मेरा तुम्हारा …

(कश्मीरी)
चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़
इक-वट बनि यि सॉन्य् तरज़

(पंजाबी)
तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल
मिलके बणे एक नवा सुर ताल

 (हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

 (सिन्धी)
मुहिंजो सुर तुहिंजे साँ प्यारा मिले जडेंह
गीत असाँजो मधुर तरानो बणे तडेंह

(उर्दू)
सुर का दरिया बह के सागर में मिले

 (पंजाबी)
बदलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले

(तमिल)
 इसैन्दाल नम इरुवरिन सुरमुम नमदक्कुम
तिसै वॆरु आनालुम आऴि सेर मुगिलाय मऴैयय पोऴिवदु पोल इसै नम इसै…

(कन्नड)
 नन्न ध्वनिगॆ निन्न ध्वनिय,
सेरिदन्तॆ नम्म ध्वनिय

(तेलुगु)
ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै, मन स्वरंगा अवतरिंचे .

(मलयालम)
 निंडॆ स्वरमुम् नींगळुडॆ स्वरमुम्
धट्टुचॆयुम् नमुडॆय स्वरम .

(बांगला)
 तोमार शुर मोदेर शुर
सृष्टि करूर अइको शुर

(आसामी)
सृष्टि हो करून अइको तान

(उड़िया) तोमा मोरा स्वरेर मिलन
सृष्टि करे चालबोचतन

(गुजराती)
 मिले सुर जो थारो म्हारो
बणे आपणो सुर निरालो

(मराठी)
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

(हिन्दी)
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा … तो सुर बने हमारा

गीतकार : पियूष पांडे
संगीतकार : अशोक पत्की , डांबर बहादुर बुडाप्रिति , प्रताप के. पठाण
गायक : पं. भीमसेन जोशी , लता मंगेशकर , कविता कृष्णमूर्ति , एम. बालकृष्णमूर्ति , सुचित्रा मित्रा

( दूरदर्शनच्या लोकसेवा संचार परिषदेच्या वतीने १५ ऑगस्ट १९८८ रोजी देशातील १४ प्रमुख भाषेतील हे गीत राष्ट्राला अर्पण करण्यात आले. )